Header Ads

Header ADS

सावदा येथील कुंभार समाजाला

सावदा येथील कुंभार समाजाला हतनूर धरणातील गाळ
सावदा प्रतिनिधी गेल्या दोन तीन महिन्यापासून कोरणा विषाणूने राज्यात धुमाकूळ घातला आहे शासनाकडून उपाययोजना म्हणुन लाँकडाउन करण्यात आले आहे यात अनेकांची उद्योगधंदे व रोजगार बुडाले असून सावदा शहरातील व परिसरातील कुंभार समाज बांधवांचे जीवनमान हे मातीकामावर  अवलंबून असून काम धंदे सद्यस्थितीत बंद असल्यामुळे अनेक कुटुंब हे उघड्यावर आले आहेत सावदा शहरात पारंपारिक रित्या वीट काम, मातीच्या चुली भांडी मूर्ती तयार करून आपली गुजराण करत असतात परंतु शासनाने कोरणा विषाणूच्या नियंत्रणासाठी घातलेल्या लोक डाऊन मुळे सावदा परिसरासह शहरातील कुंभार समाज बांधवांचा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला तरी भविष्यातील आशेचा किरण म्हणून त्यांना जवळच असलेल्या आतनूर धरणातून विनामूल्य गाळ वाहतुकीस परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी तहसीलदार यांना दिले आहे यावेळी पत्रकार शाम पाटील पितांबर कुंभार बाळू कुंभार आदी उपस्थित होते

No comments

Powered by Blogger.